राऊतांना केव्हाही आडवा करू, काकाच्या कार्यक्रमाला गालबोट नको : आ. किशोर पाटील

जळगाव: माझ्या काकाच्या कार्यक्रमाला गालबोट लावू नका, अशी विनंती करीत पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना माघारी पाठविले.पाचोरा येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत घुसण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जळगाव येथून पाचोऱ्याकडे रवाना झाले होते. गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून ते निघाले होते.शिरसोलीजवळ त्यांना पोलिसांनी अडविले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली, ते म्हणाले, की खासदार संजय राऊत हे बेताल बोलत असतात.त्यांचा आपण निषेध करतो. राऊत यांना आपण केव्हाही आडवा करू शकतो. परंतु आताचा हा कार्यक्रम माजी आमदार व आपल्या सर्वांचे लाडके आर.ओ. तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची सभा आहे.ते माझे काका आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांचे मित्र आहेत. त्यामुळे मी गुलाबरावांशी बोललो आहे. माझ्या काकांचा कार्यक्रम असल्यामुळे गालबोट न लागता तो होऊन जाऊ द्या, नंतर आपण संजय राऊत यांचा समाचार घेऊ.त्यामुळे आपण सर्व कार्यकर्त्यांनी येथून पुन्हा जळगावी माघारी फिरावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने