जेईई मेन सेशन 2 चा निकाल जाहीर, पहा कुठे अन् कसा पाहायचा निकाल

मुंबई: JEE Exam Result : जेईई मेन परीक्षा 2023 सेशन 2 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) आज जाहीर करण्यात आलाय.इंजिनियरींग अॅडमिशन मिळवण्यासाठी जेईई रँकच्या आधारावर एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIIT) आणि अन्य सीएफटीआय (CFTI) च्या अॅडमिशनसाठी उमेदवारांना 12वी मध्ये कमीत कमी 75% मिळणे गरजेचे आहे तर एसीसी, एसटी, दिव्यांग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे.

पहा कुठे पाहायचा निकाल?

एनटीए ने जेईई मेन रिझल्ट 2023ला एनटीए जेईईच्या अधिकृत साइटवर jeemain.nta.nic.in वर जाहीर केलाय . या साईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. सोबतच स्कोरकार्डला जेईई मेन वेबसाइट सोबत एनटीएच्या अधिकृत साइट nta.ac.in वरही पाहू शकता.स्कोर कार्ड कसा डाउनलोड करायचा?

  1. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in वर जावे

  2. होम पेजवर 'जेईई मेन्स 2023 सत्र 2 रिझल्ट' लिंकवर क्लिक करावे.

  3. लॉग इन करावे.

  4. जेईई मेन 2023 चा रिझल्ट स्क्रीनवर दिसणार.

  5. तुम्ही प्रिंट आउट काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने