मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! सामन्याच्या काही तास आधी दिग्गज खेळाडू जखमी अन्...

मुंबई:आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर आज घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा एक प्राणघातक खेळाडू जखमी झाला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागू शकते.IPL 2023 मध्ये जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरकडून सर्व आशा आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरला दुखापत झाली.माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, नेट सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपराला चेंडू लागला, त्यामुळे तो आगामी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो.

2019 मध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश इंग्लंडला विश्वचषक जिंकणाऱ्या संघात करण्यात आला होता. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा स्थितीत जोफ्रा आर्चरची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. त्याने आयपीएलमध्ये 36 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या एकूण टी-20 विक्रमावर नजर टाकली तर त्याने 128 डावात 167 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.मुंबई इंडियन्स अजूनही आयपीएल 2023 मधील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. मोसमातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने