वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, म्हणाल्या...

पुणे: पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मनसेच्या विविध कार्यक्रमातून वसंत मोरे यांना डावलण्यात येत असल्याचंही समोर आलं आहे. याबाबत वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एकाच कारमधून प्रवास केला आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



काल (बुधवारी) मनसे नेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.तर वसंत मोरेंसमवेत एकाच वाहनातून प्रवास केल्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या तेरा वर्षांचा हा प्रवास आहे. माझं म्हणणं असं आहे की, एकदा निवडणूक झाली की विकासाच्या कामात आमचे काहीच मतभेद नाहीत. आम्ही समन्वयाने काम करतो. गेल्या १३ वर्षामध्ये मला वसंत मोरे यांची मदतच झाली असेल, कदाचित माझाच त्यांना त्रास झाला असेल. याहून जास्त काही सांगू शकत नाही” असंही पुढे त्या म्हणाल्यात.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे नेते वसंत मोरे यांनी काल एकत्र कात्रज भागातील उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात पाहणी केली. दरम्यान त्यांच्या या भेटीने अनेक चर्चाना उधाण आलं आहे, वसंत मोरे हे पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज असल्याचा चर्चा आहेत. अशात या दोन्ही नेत्यांच्या भेटीने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. बोलताना त्या म्हणाल्या की, वसंत मोरे आणि आमचा मागील १३ वर्षांचा प्रवास आहे. आम्ही समन्वयाने काम करतो असं त्या म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने