भाजपचे माजी उपमुख्यमंत्री काँग्रेसमध्ये दाखल; डीके शिवकुमार यांनी केली मोठी घोषणा

कर्नाटक: कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यादरम्यान भाजपचे माजी नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी याची घोषणा केली.लक्ष्मण सवदी यांनी बेंगळुरूमध्ये 12 एप्रिल रोजी विधान परिषद सदस्यपदाचा आणि अथणी मतदारसंघाचे तिकीट गमावल्यानंतर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने