कोणीच नाही उरलं तर आता आमिर खानवर डागली कंगनानं तोफ.. म्हणाली, 'हृतिकच्या केसनंतर यानेही मला..'

मुंबई:  अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच बॉलीवूडवर हे आरोप करत आलीय की हृतिक रोशनच्या केसनंतर तिला सगळ्यांनी एकटं पाडलं होतं. कंगना रनौत याआधीच करण जोहरवर नेपोटिझमचा आरोप लावून मोकळी झालीय. तर शाहरुख,सलमान आणि आमिर खानविषयी तिखट प्रतिक्रिया देऊनही मोकळी झाली आहे. हो,एक काळ होता जेव्हा आमिर खान कंगना रनौतचा अभिनय आणि तिच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीची खूप प्रशंसा करायचा. आता बऱ्याच दिवसांनी कंगनाला आपले जुने दिवस आणि आमिर खानची मैत्री आठवतेय.



कंगना रनौतनं आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओत याविषयी शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती आमिर खानचा शो 'सत्यमेव जयते' मध्ये गेली होती. ज्यावेळी कंगनानं सिनेमातील आयटम सॉंग आणि त्यांच्या स्टेप्सविषयी बातचीत केली आहे.कंगना म्हणाली आहे,''सिनेमात जे अश्लील आयटम सॉंग दाखवले जातात त्याच्यावर एकदा एक मुलगी रिहर्सल करत होती. त्या स्टेप्स ती करताना क्यूट वाटत होती पण मी विचार करत होते की या अशा गाण्यावर ताल धरताना हिची मानसिकत तशी होऊ नये..कारण जेव्हा तिला कळेल की मी असे काहीतरी विचित्र हावभाव करुन नाचले की याची प्रशंसा होतेय..तर असंच करायला हवं असं तिला वाटेल''.

कंगनानं या व्हिडीओसोबत आमिर खानसाठी एक मेसेज देखील शेअर केला आहे. कंगनानं लिहिलं आहे-''मला देखील कधी-कधी ते दिवस आठवतात जेव्हा आमिर सर माझे चांगले मित्र होते. कुठे गेले ते दिवस..''कंगनाने हृतिक आणि आपल्या रिलेशनशीपविषयी जे जाहिरपणे सांगितलं होतं त्याला हृतिकनं स्पष्ट खोटं म्हणत नाकारलं होतं. त्यानंतर कंगनानं काही मेल्स शेअर केले होते आणि एका मुलाखतीत हृतिकला आपला एक्स बॉयफ्रेंड म्हणत खूप काही बोलून गेली होती.हृतिकनं यानंतर कंगनाला कायदेशीर नोटिस पाठवली होती. जेव्हा कंगनानं याचं उत्तर दिलं नाही तेव्हा त्यानं कंगना विरोधात केस ठोकली होती. कंगनानं देखील हृतिक विरोधात केस दाखल केली होती आणि अजूनही ती केस सुरूच आहे.

कंगनानं पुढे लिहिलं आहे-''एक गोष्ट मात्र पक्की आहे की आमिर सरांनी मला मेंटोर केलं आहे. त्यांनी माझी प्रशंसा केली आणि हृतिकच्या केसआधी त्यांना माझ्या बऱ्याच गोष्टी आवडायच्या. ते मला खूप गोष्टींबाबत मार्गदर्शन करायचे. पण त्या केसनंतर त्यांनी आपला पाठिंबा स्पष्ट केला. आणि एका महिलेविरोधात संपूर्ण इंडस्ट्री उभी राहिली''.तुम्हाला माहितीसाठी इथे सांगतो की हृतिक रोशन आणि कंगना रनौतनं 'क्रिश ३' आणि 'काइट्स' मध्ये एकत्र काम केलं होतं. 'क्रिश ३' च्या शूटिंग दरम्यान हृतिक आणि कंगनाच्या अफेअरच्या खूप अफवा उठल्या होत्या.त्यानंतर 'आशिकी 2' मध्ये हृतिक आणि कंगनाला कास्ट करण्याची गोष्ट समोर आली होती पण हृतिकनं कंगनाला सिनेमात घेण्यासाठी नकार दिला. आणि इथूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने