पाठीत वार करणारे बाळासाहेबांचा विचार..., कपिल सिब्बल यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवशीय अयोध्या दौऱ्यावर होते. राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना शिंदेंच्या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. हे असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर ट्विट करत निशाना साधला आहे. पाठीत वार करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत.अशा शब्दात त्यांनी निशाना साधला आहे.कपिल सिब्बल यांचे ट्विट

भगवान रामाने त्याग, सत्य आणि प्रामाणिकपणा निवडला. बाळासाहेबांनीही ते गुण आत्मसात केले. बाळासाहेबांचा वारसा कारस्थानी, संधिसाधू, पाठीत वार करणारे कधीही पुढे नेऊ शकत नाही.दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल ९ महिने सुनावणी सुरू होती. दरम्यान कोर्टाच्या निकालावर देशाचं लक्ष लागून आहे.सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यासाठी दुपारी १ वाजता मंत्री मंडळाची बैठक बोलावली आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत पिकांच्या नुकसानीवर उपाययोजना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने