ठाकरेंनी आधी दिल्लीत यावं मग राहुल गांधी येतील; वेणुगोपाल 'मातोश्री'वर, म्हणाले...

मुंबईः के.सी. वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, भाई जगताप, आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. उद्धव ठाकरे यांचा एक लढा सुरु आहे त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभं असल्याचं वेणुगोपाल यांनी यावेळी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार माणून देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.काय म्हणाले वेणुगोपाल?

  • उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस खंबीरपणे त्यांच्यामागे उभी आहे

  • सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्रितपणे लढू इच्छितात

  • नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत

  • आम्ही सोबत आहोत, हा मेसेज या भेटीतून आम्हांला द्यायचा आहे

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • देशात सध्या मी आणि मीच सुरुय. या मी करणाविरुद्ध विरोधकांचं समीकरण जुळत आहे

  • आम्ही जेव्हा दोस्ती करतो तेव्हा ते एक नातं तयार होतं

  • आता मित्र कोण आणि विरोधक कोण, हे आमच्या लक्षात आलेलं आहे

  • काहींनी शिवसेनेमध्ये गद्दारी केली आहे

  • आम्ही लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी एकत्र आहोत

यावेळी के.सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीचं निमंत्रण दिलं. ठाकरेंनी आधी दिल्लीत यावं त्यानंतर राहुल गांधी 'मातोश्री'वर येतील, असं वेणुगोपाल म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने