केरळमधून 32 हजार मुली बेपत्ता होण्याची ही कहाणी.. या सत्य कथेत किती गोष्टी रचलेल्या..

मुंबई: अभिनेत्री अदा शर्मा अभिनित आणि सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरल स्टोरी' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर २६ एप्रिलला रिलीज झाला आणि तेव्हापासून वादाला सुरुवात झाली. मेकर्सचा दावा आहे की सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. एखाद्या राज्यातून ३२ हजार मुली धर्म बदलून दहशतवादी संघटनेत सामिल होणार तर कोणाला कळणार नाही का? हे कसं शक्य आहे..असा सवाल आता उठत आहे.



सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की या मुलींना व्यवस्थित प्लॅन करुन फसवलं आहे. सुरुवातीला त्यांना इस्लाम धर्माच्या जवळ नेलं जातं. नंतर लव्ह जिहादसाठी मुस्लिम मुलाशी त्यांचे लग्न केले जाते आणि नंतर नर्स बनण्यासाठी त्यांना विदेशात पाठवलं जातं. जिथे त्या ISIS च्या तावडीत सापडतात.सिनेमाचा ट्रेलर समोर येताच त्यावरनं खळबळ उडाली आहे. एक ठराविक वर्ग या ट्रेलरला प्रमोट करताना दिसत आहे,तर काही लोक सिनेमाला अजेंडा बोलत आहेत. ट्वीटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सिनेमा तर बनवून झाला आहे, ट्रेलर देखील रिलीज झाला आहे, पण प्रश्न हा आहे की सिनेमातून जो दावा केला आहे त्यात किती सत्य आहे आणि किती खोटं? जानेवारी २०२२ मध्ये एनआईए नं खुलासा केला होता की केरळमध्ये इस्लामिक स्टेटचे स्लीपर सेल्स सक्रिय आहेत. त्यावेळी आठ दहशतवाद्यांविरोधात चार्जशीट फाईल केली गेली होती. एनआयएचा दावा होता की केरळच्या मुसलमान तरुणांना दहशतवादाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये महिला देखील सामिल होत्या असं सांगितलं गेलं.

ओमन चांडी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दी दरम्यान धर्म परिवर्तनाचे आकडे समोर आले होते. त्या आकड्यांच्या आधारे समोर आलं की २००६ ते २०१२ दरम्यान जवळपास ७७१३ लोकांनी इस्लाम धर्म कबूल केला होता.२००९ ते २०१२ दरम्यान जेवढे लोक कन्व्हर्ट झाले होते त्यामध्ये २६६७ महिला होत्या. यामध्ये २१९५ तरुण हिंदू मुली होत्या आणि ४९२ तरुण ईस्लाम धर्मीय मुली होत्या.त्यावेळी सीएम चांडी यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की २००६ ते २०१२ दरम्यान २८०३ लोकांनी हिंदू धर्म स्विकारला होता. त्याव्यतिरिक्त २००९ ते २०१२ दरम्यान ७९ मुलींनी मुसलमान धर्म स्विकारला होता आणि दोन मुलींनी हिंदू धर्म.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने