करण जोहर पुन्हा चुगली करण्यास सज्ज! या दिवशी येणार 'कॉफी विथ करण' चा आठवा सिझन..

मुंबई:   बॉलीवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या त्याच्यात आणि कंगनात सोशल मिडियावर शित युद्ध होतांना दिसत आहे. कंगना त्याच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही.तर करणनेही तिला चांगलच प्रतिउत्तर देतांना दिसला आहे. करण जोहर नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखला जातो. परखड वक्तव्य करण्यातही करण हा बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याचबरोबर करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या शो साठीही खुप प्रसिद्ध आहे.

आता करणचा 'कॉफी विथ करण' या शो बद्दल काही जास्त बोलण्याची गरज नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर करण त्याच्या शो मध्ये मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहऱ्याना बोलावतो आणि त्याच्यासोबत गप्पा मारतांना दिसतो. यात करण त्याच्या वैयक्तिक आणि व्यासायिक वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारतो आणि कलाकार यावर खुलासा करतात.या शोमध्ये अनेक कलाकारांच्या जोड्याही जमल्या आहेत. ज्यात आलिया-रणबीर, सिद्धार्थ- कियारा आणि विकी- कतरिनाची जोडी जमली होती.
या शोने आतापर्यंत सात सीझन पूर्ण केले आहेत आणि आता करणने आता आठव्या सीझनसाठी जोरदार तयारी केली आहे. एक संबंधित बातमी समोर येत आहे की करणला शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला आमंत्रित करायचं आहे.सगळ्यांनाच माहीत आहे की गेल्या एका वर्षात दोन्ही स्टार्सच्या आयुष्यात लग्नापासून मुलगी राहा पर्यंत बरेच काही घडले आहे.अशा परिस्थितीत करणला शोमध्ये येऊन त्याच्या विवाहित आणि पालकत्वाच्या आयुष्याविषयी पहिल्यांदाच चाहत्यांना सर्व काही उघडपणे सांगायचं आहे.

आलिया आणि रणबीरशिवाय करणच्या मनात शाहरुख खानचंही नाव आहे, जो सातव्या सिझनमध्ये दिसला नव्हता. यात तो त्याच्या पठाण चित्रपटाबद्दल बोलतांना दिसत आहे.गेल्या सीझनमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग पहिल्या एपिसोडमध्ये दिसले होते. करण जोहरने सीझन 8 साठी करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासह इतर प्रसिद्ध स्टार्सना बोलावण्याची तयारी आहे. या प्रसिद्ध शोचा नवीन सीझन जूनच्या अखेरीस ऑनलाइन स्ट्रीम होईल. Disney+ Hotstar हा सिझन पाहता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने