इरफान खानचा शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स'चा ट्रेलर रिलिज! चाहते भावूक

मुंबई: इरफान खानचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' हा चित्रपट हिंदीत रिलिज होणार आहे. आता 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आलं आहे. अभिनेत्याचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार इरफानचा हा चित्रपट थिएटरमध्ये लवकरच पाहता येणार आहे. इरफानचा मुलगा मुलगा बाबिल त्याच्या सोशल मिडियावर याची माहिती दिली आहे.बाबिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे या चित्रपटातही इरफान खानने त्याच्या अभिनयाने सर्वांना थक्क केले आहे. यात तो राजस्थानी शैलीत दिसत आहे.ट्रेलरची सुरुवात गोलशिफ्तेह फराहानी म्हणजेच नूरनचे पात्र दाखवून झाली आहे. ती या चित्रपटात वैद्याची भुमिका करतांना दिसत आहे. विंचू चावल्यानंतर फराहानी उपचारासाठी खूप दूर जाते. त्याचबरोबर इरफान हा आदमलाची भुमिका साकरत आहे जो नूरनचा प्रियकर दाखवण्यात आला आहे. तो इरफान फराहानीला लग्नासाठी विचारतांना दिसतो.त्यानंतर त्याच्या प्रेमाला विरोध आणि त्यापरिस्थिती त्यांची कुचंबणा हे सर्वच दिसत आहे. चित्रपटाची कथा राजस्थानमधील एका गावातील आहे. प्रत्येक दृश्यात तुम्हाला वाळवंट दिसते. चित्रपटाचे संगीत अतिशय दमदार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. बराच गोंधळ आहे. इरफानचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' सुमारे 6 वर्षांपूर्वी 2017 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट स्विस-फ्रेंच-सिंगापूर या भाषेत बनवण्यात आला होता, मात्र आता तो हिंदीत प्रदर्शित होत आहे.इरफानच्या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना बाबील खानने लिहिले - 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने