कर्नाटक नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये येडियुराप्पा सहभागी नव्हते

बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा उमेदवार निवडीबाबत दिल्लीत झालेल्या ज्येष्ठांच्या बैठकीबाबत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच येडियुराप्पा दिल्लीहून बंगळूरला निघून आले. सव्वा पाचच्या विमानाने ते बंगळूरला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.येडियुराप्पा यांनी आपल्या जवळच्या मित्रांना सांगितले की, माझी हायकमांडशी चर्चा संपली आहे, म्हणून मी बंगळूरला येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरात बैठकीचे आयोजन केले होते. नड्डा घरी आल्यानंतर १० मिनिटांत येडियुराप्पा घराबाहेर आले आणि बंगळूरकडे निघून गेले.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर कर्नाटक नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये येडियुराप्पा सहभागी नव्हते, अशी माहिती आहे. राज्य नेत्यांची स्वतंत्र बैठकच त्यांच्या निराशेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. रविवारच्या बैठकीनंतर येडियुराप्पा निराश होऊन बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आजच्या बैठकीसाठी गेल्यानंतर येडियुराप्पा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आले.

चर्चेदरम्यानच माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा नड्डा यांच्या घरातून बाहेर पडत गेटवर आले. मात्र, बैठकीनंतर मुख्यमंत्री बोम्मई निघून गेल्यानंतर नड्डा यांच्या घरी येडियुराप्पा पुन्हा आले. परंतु, अवघ्या १० मिनिटांनी येडियुराप्पा घराबाहेर पडले.भाजपच्या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, ‘‘रविवारी सर्वच मतदारसंघांबाबत चर्चा होती. मात्र काही मतदारसंघाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अध्यक्षांनी त्याबाबत तपशील मागितला, म्हणून मी तपशील दिला आहे. उमेदवारी निवडीची यादी आज रात्री किंवा उद्या प्रसिद्ध होईल. मी दिलेली माहिती, मते ज्येष्ठ नेत्यांनी ऐकून घेतली आहेत.’’ सकाळी बैठकीला गैरहजर का होता, असे विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी काही रणनीती आखण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली होती म्हणून म्हणून मी निघून आलो.

नाराज नाही, आनंदी आहोत

नड्डा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर येडियुराप्पा यांनी जाहिरातीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचे नड्डा यांनी सांगितले. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, यात शंका नाही. उमेदवारी वाटपात विलंब होत असल्याने येडियुराप्पा नाराज नाहीत, मीही नाराज नाही, आनंदी आहे, असे नड्डा म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने