LIC ची ही Policy तुम्हाला देणार दर महिन्याला चक्क 11,000 रुपये पेंशन

मुंबई: अनेकजण एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये पैसे इनवेस्ट करतात पण तुम्हाला एलआयसीच्या एका पॉलिसीविषयी माहिती आहे का? या पॉलिसीमुळे तुम्हाला महिन्याला ११,००० रूपये पेंशन मिळू शकतात.एलआयसी आपल्यासाठी एक नवीन पॉलिसी घेऊन आलाय. या पॉलिसीद्वारे तुम्ही कोणत्याही मेहनतीशिवाय महिन्याला ११ हजार रूपये पेंशनचा फायदा मिळवू शकता. या पॉलिसीचे नाव न्यू जीवन शांति पॉलिसी आहे. LIC च्या या स्कीममध्ये तुम्ही कमी इनवेस्टमेंटमध्ये जास्त नफा मिळवू शकता.ही एलआयसी स्कीम एक एन्युटी प्लॅन आहे, या प्लॅनला खरेदी केल्यानंतरच तुमची पेंशनची किंमत फिक्स होणार. तुम्हाला दर महिन्याला एलआयसीकडून पैसे मिळतात. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन मिळणार. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेफर्ड एन्युटी फॉर जॉइंट लाइफ असणार.डेफर्ड एन्युटीद्वारा तुम्ही एका व्यक्तिसाठी पेंशन स्कीम घेऊ शकता. यामध्ये 30 वर्षापासून 79 पर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतं. या स्किमला खरेदी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 लाख रुपये इनवेस्ट करावे लागणार. जर तुम्हाला पॉलिसी आवडली नाही तर तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकता. यासोबतच यामध्ये एलआयसीकडून लोनची सुविधाही उपलब्ध आहे.

जर तुम्ही या पॉलिसी घेत असाल तर सिंगल लाइफसाठी डिफर्ड एन्युटी मध्ये 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हालाा 11,192 रुपये दर महिन्याला पेंशन मिळू शकते. जर तुम्ही 1.5 लाख रुपये इनवेस्ट करत असाल तर दर महिन्याला 1000 रुपये पेंशन मिळवू शकता.जर डेफर्ड एन्युटी सिंगल लाइफसाठी कुणी घेतली असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यु झाला असेल तर पुर्ण पैसे नॉमिनीला मिळणार. यासोबतच जर पॉलिसी होल्डर जीवंत असेल तर त्याला एका ठरावीक वयानंतर पेंशन मिळणे सुरू होणार.जर जॉइंट लाइफ बाबत सांगायचं झालं तर अशा वेळी जर एका व्यक्तीचा मृत्यु झाला तर दुसऱ्याला पेंशनची सुविधा मिळणार पण दोन्ही व्यक्तीचा मृत्यु झाला तर तो संपूर्ण पैसा नॉमिनीला मिळणार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने