आयुष्याची १० वर्ष बरबाद झाली.. जिया खान केसमध्ये निर्दोष सुटल्यानांतर सुरजची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी निकाल दिला.संपुर्ण देशाच लक्ष जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालाकडे लागून होते.याप्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुरजने सोशल मीडियावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिलीय.सुरजने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्यात.. यात सुरज लिहितो.."सत्याचा नेहमीच विजय होतो.." सुरज पुढे लिहितो.."हा निर्णय यायला १० वर्ष लागले.या काळात मी जो वेळ घालवलाय तो खूप वेदनादायी आणि रात्रीची झोप उडवणारा आहे.आज मी केवळ ही केस जिंकलो नाही तर माझ्यातला आत्मविश्वास मी परत मिळवला आहे." अशी पोस्ट करत सुरजने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.3 जून 2013 रोजी अभिनेत्री जिया खानचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल २८ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता.अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता.जियाने सूरज पांचोली विरोधात लिहिलेल्या सहा पानी पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

जियाने 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'निशब्द' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. जियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.जियाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर जिया खान 2008 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी'मध्ये आमिर खानसोबत दिसली.न्यायमूर्ती एएस सय्यद यांचा हा निर्णय पुराव्याआभावी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. सुरज पांचोलीने जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने