मोठी बातमी! अजित पवारांनी साधला ४० आमदारांशी संपर्क, राज्यपालांकडे देणार यादी?

मुंबई: महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, त्यांनी आमदारांची बैठक बोलावल्याचेही वृत्त समोर आले आहे. दरम्यान द न्यू इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याबाबत ते राज्यपालांना यादी देणार असल्याची चर्चा आहे.अजित पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलच्या अटकळी गेल्या आठवड्यापासून जोरात सुरू आहेत. अजित पवार यांनी नियोजित बैठका रद्द केल्या आणि भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.



योग्यवेळी आल्यावर ४० आमदारांची यादी अजित पवार राज्यपालांकडे देणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. अजित पवार यांनी वयैक्तिक रीत्या ४० आमदारांना संपर्क साधला आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.राज्यातील सत्तासंघर्षावरील निर्यण काही दिवसांवार येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आधी अजित पवार यांनी शपथ घेतल्यास सरकार पडणार नाही, असे देखील वृत्तात म्हटले आहे.“आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल,” अशी माहिती पक्षातील एका चांगल्या सूत्राच्या हवाल्याने द न्यू इंडियन एक्प्रेसने दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे यावर खडखडीत मौन आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावले असताना शरद पवार यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. २०१९ मध्ये अजित पवार बंड केल्यानंतर शरद पवार यांनी आपला पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना बोलावले होते, अशी माहिती देखील द न्यू इंडियन एक्प्रेसने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने