निवडणुकीपूर्वी मोठा सर्व्हे समोर; जाणून घ्या कोणाचं बनतंय सरकार, भाजप की काँग्रेस?

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचलीये. सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यामध्ये काहींना डावलं जात आहे, तर काहींना संधी दिली जात आहे. यामुळं तिकीट न मिळालेले नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत, त्यामुळं कोणत्याही पक्षाला सत्तेवर येण्यासाठी 123 जागा जिंकणं आवश्यक आहे. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात एक मोठा सर्व्हे समोर आलाय.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचण्यांच्या मेगा सर्व्हेत यावेळी काँग्रेसला (Congress) बंपर विजय मिळताना दिसत आहे. लोक सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 66-69 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 128-131 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाबाबत बोलायचं झालं तर 65000 लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलंय.कर्नाटक मेगा सर्वेक्षण

  • भाजप-66-69

  • काँग्रेस-126-131

  • जेडीएस- 21-25

  • इतर - 0-2

कर्नाटकमधील 224 पैकी 222 जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षानं तिसरी आणि शेवटची यादीही जाहीर केली आहे. शेवटच्या यादीत 10 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपनं 224 पैकी 222 उमेदवारांची घोषणा केली आहे. 11 एप्रिल रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली, त्यात 189 उमेदवार, दुसरी यादी 12 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली, त्यात 23 उमेदवार, तिसरी यादी 17 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली, त्यात 10 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने