RRR नंतर राजामौलीचा आणखी एका पौराणिक चित्रपट.. हनुमानाच्या रुपात दिसणार 'हा' सुपरस्टार

मुंबई: एसएस राजामौली आरआरआरने तर सगळ्या जगातच धुराळा केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर सुपरहिट ठरलाच मात्र त्याने ऑस्कर सारख्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या चित्रपटाच्या यशानंतर चाहते फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत ती म्हणजे एसएस राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटाची.गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा होती की, राजामौली यांचा आगामी चित्रपट हा इंडियाना जोन्स आणि जेम्स बॉण्ड यांच्यासारख्या हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देणारा असेल. या चित्रपटात अभिनेता म्हणून साउथ सुपरस्टार महेश बाबू हा मुख्य भुमिकेत असेल.आता या संदर्भात बातमी समोर आली आहे की, महेश बाबू राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटात हनुमान यांच्यासारखी भूमिका साकारू शकतात.महेश बाबू राजामौलीच्या पुढच्या चित्रपटात हनुमानजींपासून प्रेरित भूमिका साकारू शकतात. बजरंगबलीसारखीच भूमिका महेश बाबूची असून या चित्रपटातील व्यक्तिरेखा रामायणातील हनुमानजींच्या पात्राप्रमाणेच पुढे जाईल.आरआरआरमध्ये ज्याप्रमाणे भीम आणि राम यांच्या पात्रांमध्ये साम्य दाखवण्यात आले होते, त्याचप्रमाणे या चित्रपटात महेश बाबूचे पात्र हनुमानजीपासून प्रेरित असणार आहे. असा दावा करण्यात येत आहेत.

राजामौली यांच्या पुढील चित्रपटाचे नाव काय असेल याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सध्या या चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरू आहे. शूटिंगही सुरू झालेले नाही.हा चित्रपट भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असेल, ज्याचे चित्रीकरण अॅमेझॉनच्या जंगलात केले जाईल असा दावा करण्यात येत आहे. यात व्हीएफएक्स असेल जे हॉलीवूड चित्रपटांमध्ये व्हीएफएक्समध्ये काम करणारी कंपनी तयार करेल.राजामौलींचा हा चित्रपट 2025 च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. असे म्हटले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने