मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा पब्लिकनं घेरल्यावर भडकली.. मागचा-पुढचा विचार न करता धमकी देत म्हणाली..

मुंबई:  शाहरुख खानच्या जलवान सिनेमाची अभिनेत्री आणि लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी नयनतारा काही दिवसांपूर्वीच आपला पती विघ्नेश शिवनसोबत मंदिरात पोहोचली होती,त्यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. पंगुनी उथीराम(दक्षिण भारतातील एक सण) च्या शुभ प्रसंगी हे कपल मंदिरात दर्शनासाठी पोहचलं, ज्यानंतर एका वादाचा जन्म झाला.नयनतारा मंदिरात दर्शनासाठी गेली असताना काहीशी रागात दिसली,ज्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओत आपण पाहू शकता की एका चाहत्यानं आपल्या कॅमेऱ्यानं अभिनेत्रीला शूट करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे नयनाताराच्या रागावरचं नियंत्रण सुटलं.व्हिडीओत आपण पाहू शकता की चाहत्यानं नयनताराला पाठमोरं शूट करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे अभिनेत्री काहीशी त्रस्त दिसली. माहितीसाठी इथं सांगतो की,नयनतारा आपला पती विघ्नेश शिवनसोबत कुंभकोणम जवळील कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शन करण्यासाठी गेली होती.नयनताराला पाहून लोकांनी तिला लागलीच घेरलं. त्यामुळे अभिनेत्रीला मनापासून देवाचं दर्शन घेता आलं नाही जसा तिनं विचार केला होता. नयनतारा आणि तिचा पती मंदिरात देवाचं दर्शन करण्यासाठी पुन्हा गेले,तेव्हा तर पब्लिक आवरणं कठीणच गेलं आणि नयनताराच्या रागावारचा ताबा सुटला.

नयनताराचा चाहत्यांवर चिडलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये पोलिस गर्दीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहू शकतो. तर विघ्नेश शिवन चाहत्यांना समजावताना दिसत आहे. पण तोपर्यंत नयनताराचा संयम मात्र सुटतो आणि ती एका चाहत्याला त्याचा फोन तोडण्याची धमकी देताना दिसते,जो तिला शूट करत होता.हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीच्या तशा वागण्याचं समर्थन केलं तर काहींनी मात्र ट्रोल केलं. नयनताराला काही दिवसांपूर्वी हॉरर थ्रिलर 'कनेक्ट' मध्ये पाहिलं गेलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने