मालकीणबाई खूश झाली, रिंकूला म्हणाली तू तर...

मुंबई:  सध्या आयपीएलचा फिवर सर्वत्र दिसून येत आहे. नुकताच KKR विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार सामना खेळण्यात आला. IPL 2023 च्या सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक सामना होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातच एक धडाकेबाज खेळाडू समोर आला आणि तो म्हणजे रिंकू सिंह.त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. रिकू सिंहने अखेरच्या षटकात मारलेल्या पाच सिक्सच्या जोरावर हा विजय मिळवता आला. पण अखेरच्या ओव्हरमध्ये रिंकूच्या फटकेबाजीने कोलकाताचा विजय साकार झाला. कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 207 धावा केल्या.या सामन्याचा खरा हिरो रिंकू सिंह ठरला. शाहरुख खानने देखील त्याच्या विजयाची दखल घेतली आणि 'पठाण' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याच्या जागी रिंकू सिंहचा फोटो लावत त्याचं अभिनंदन केलं.दरम्यान, अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या रोमांचक सामन्यात विजय मिळवून दिल्याबद्दल रिंकू सिंहचं कौतुक केलं.सुहानाने इंस्टाग्रामवर तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "असाधारण". तर अनन्या पांडे हिने देखील रिंकूची पोस्ट स्टोरीला टाकत त्याचं कौतुक केलं आहे.

या विजयासह केकेआर चार गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये दोन विजय आणि एक पराभव स्विकारला आहे.तसेच गुजरात टायटन्सने देखील आत्तापर्यंत खेळलेल्या तीन पैकी दोन सामने जिंकले असून, एक पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे देखील ४ गुण आहेत.पण ते चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. केकेआर चांगल्या नेट-रन-रेटमुळे गुजरातपेक्षा वरच्या स्थानावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने