आमरसासोबत पाणीपुरी! "गरूडपुराणात यासाठी वेगळी शिक्षा"; नेटकरी सुसाट

मुंबई: पाणीपुरी सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पाणीपुरी दिसली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत असते. तर अनेकजण पाणीपुरीसोबत वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोल्डड्रिंकसोबत पाणीपुरी, आईस्क्रीमसोबत पाणीपुरी असे प्रकार आपण पाहिले असतील पण आमरसासोबत पाणी पुरी असं कॉम्बिनेशन आपण कधी पाहिलंय का?सोशल मीडियावर सध्या आमरस पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाणीपुरीमध्ये आमरस टाकून ही पाणीपुरी खाल्ली जात असल्याचं दिसत आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "या अशा कामाला गरूड पुराणात वेगळी शिक्षा आहे" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्यात.दरम्यान, "कृपया पाणीपुरीसोबत छेडछाड करू नका, नरकामध्ये यासाठी वेगळी शिक्षा द्यायला पाहिजे, मी हात जोडतो पण असे प्रयोग करू नका, ही पाणीपुरी कशी लागते?" अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने