मुंबई: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा प्रसिद्ध चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'च्या यशानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पोन्नियिन सेल्वन 2' सध्या खूप चर्चेत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'पोनियिन सेल्वन: 2' ची कथा महान सम्राट राजा चोल यांच्यावर आधारित आहे.या चित्रपटाच्या पहिल्या भागातही कथा या राजाभोवती फिरताना दिसली होती. आता दुसऱ्या भागात ही कथा पुढे सरकताना दिसणार आहे. लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलिच पंसती मिळत असल्याच समोर आलेल्या ट्विटर रिव्हू मधुन दिसत आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'Ponniyin Selvan 1' ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि भरपूर कमाई केली. हा चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर ठरला होता.दुसरीकडे, 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटाचा दुसरा भागही आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, चित्रपटाची ग्रँड ओपनिंग पाहता हा पहिल्या भागाप्रमाणेच अनेक विक्रम मोडेल असे वाटते.तर दुसरीकडे 'PS 2' रिलीज होताच चाहत्यांनी ट्विटरवर चित्रपटाचा रिव्हू देखील शेअर करण्यास सुरुवात केली आहे. बर्याच युजर्सनी चित्रपटाचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी या चित्रपटाला 'भारतीय सिनेमाचा अभिमान' देखील म्हटलं आहे. अनेकांना एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' पेक्षा हा चित्रपट जास्त आवडलेला आहे.
'पोन्नियिन सेल्वन 2' सिनेमा पाहिल्यानंतर लोक ऐश्वर्या राय-बच्चन आणि साऊथ सुपरस्टार विक्रमनं साकारलेल्या भूमिकांचे तोंडभरून कौतूक करत आहेत. हा चित्रपट तामिळ आणि हिंदीसह पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.'पोन्नियिन सेल्वन' 30 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली, तर जगभरातील चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाई केली. आता सर्वांच्या नजरा 'पोपोन्नियिन सेल्वन 2'वर खिळल्या आहेत, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचे किती लक्ष वेधून घेतो हे पाहावे लागेल.