सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत CM शिंदे ११ व्या स्थानावर; मग पहिलं कोण?

नवी दिल्ली: जगातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून अशी नवी ओळख मिळालेल्या भारतातील अनेक मुख्यमंत्रीही गर्भश्रीमंत आहेत. सध्याच्या विद्यमान ३० पैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर)ने म्हटले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहे. त्‍यांच्याकडे एकूण ५१० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.धनवान मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या १५ लाखांच्या संपत्तीसह शेवटच्या क्रमांकावर आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रत्येकी मालमत्ता तीन कोटी रुपये आहे, असे ‘एडीआर’ने म्हटले आहे.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेली स्वत:ची मतदान प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण केल्यानंतर सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्र्यांबाबत निष्कर्ष काढले असल्याचे ‘एडीआर’ आणि ‘इलेक्शन वॉच’(एनईडब्लू) या संस्थांनी म्हटले आहे.

शिक्षण व मुख्यमंत्र्यांची संख्या

दहावी उत्तीर्ण १

बारावी उत्तीर्ण ३

पदवीधर ११

व्यावसायिक पदवीधर ४

पदव्युत्तर ९

डिप्लोमा (पदविका) १

डॉक्टरेट १एकनाथ शिंदे दहावी उत्तीर्ण

एडीआरच्या अहवालात मुख्यमंत्र्यांची शिक्षणविषयक माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहावी उत्तीर्ण आहेत तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे डॉक्टरेट आहेत. मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीची दखल एडीआरने घेतली आहे.

सर्वाधिक मालमत्ता असलेले अव्वल तीन मुख्यमंत्री (आकडे कोटी रुपयांत)

५१० - जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)

१६३ - पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश)

६३ - नवीन पटनाईक (ओडिशा)

सर्वांत कमी मालमत्ता असलेले तीन मुख्यमंत्री (आकडे रुपयांत)

१ कोटी - पिनराई विजयन (केरळ)

१ कोटी - मनोहरलाल खट्टर (हरियाना)

१५ लाख - ममता बॅनर्जी (पश्‍चिम बंगाल)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने