'आयुष्यभर काय ती बिना लग्नाचीच राहिल का?', भाईजान भडकला!

मुंबई :  बॉलिवूडचा भाईजान म्हणुन ओळख असणारा सलमान खान नेहमीच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तो नेहमीच त्याच मत मोकळेपणाने मांडत असतो. त्याच्या जवळच्या व्यक्तीची त्याला नेहमीच विशेष काळजी असते. त्यांच्या भल्यासाठी तो कामही करतो त्यांना योग्य सल्लेही देत असतो.सलमान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सलमानचा हा चित्रपट येत्या ईदला रिलिज होणार आहे. सध्या या चित्रपटाची संपुर्ण टिम या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत.याआधी मोठ्या दिमाखदार पद्धतिने या चित्रपटाचं टिझर रिलिज झाला. या दरम्यान चित्रपटातील सर्वच कलाकार या उपस्थित होते.अलीकडेच सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली. दरम्यान यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.ज्यात सलमान खान शहनाजला पुन्हा एकदा मुव्ह ऑन करण्यासाठी सांगतांना दिसत आहे. याआधीही ट्रेलर रिलिज करण्याच्या कार्यक्रमातही तो याचविषयी बोलला होता.जिथे सलमान खानने सिदनाजच्या नावाने पोस्ट शेअर केल्याबद्दल नेटकऱ्यांचा जोरदार क्लास घेतांना दिसला. सलमान जेव्हा या गोष्टी बोलत होता तेव्हा शहनाज आणि कपिल खूपच गंभीर दिसत होते.

सलमान म्हणाला की, 'काही काळापासून लोक शहनाजला पाहिल्यानंतर सिदनाज-सिडनाज म्हणत असतात.आता तो या जगात नाही आणि तो कुठेही असला तरी शहनाजच्या आयुष्यात कोणीतरी यावं, तिनं लग्न करावं, मुलं व्हावीत असं त्यालाही वाटेल. ती नेहमीच कुमारी राहिल का? या सर्व सिदनाज करणाऱ्यापैकी तिने जर एकाला निवडल तर तो आता म्हणेल, 'हो मी तुझाच आहे'.या काय मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, कोणाचही ऐकू नको, फक्त तुमच्या मनाचं ऐक आणि जीवनात पुढे जा.'कामाच्या आघाडीवर, शहनाज गिल सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असली तरी शहनाजच्या करिअरसाठी ती मोठी मानली जाते. बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल याआधी अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने