म. गांधींनंतर आता मौलाना आझाद, ३७० कलमचा संदर्भही पुस्तकातून गायब!

नवी दिल्ली : NCERTनं आपल्या अकरावीच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकातून स्वातंत्र लढ्यातील आणखी एक अग्रणी नाव असलेल्या आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा संदर्भ वगळला आहे. यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा आणि त्यानंतरच्या स्वतंत्र भारताचा संदर्भ वगळला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राज्यशास्त्राच्या पुस्तकातील पहिल्या धड्यामध्ये ज्याचं नाव 'कॉन्स्टिट्युशन व्हाय आणि हाऊ' या प्रकरणात कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कमिटी मिटिंगमधील मौलाना आझाद यांचा संदर्भ वगळून तो धडा अपडेट करण्यात आला आहे.ज्या ओळींमध्ये हा बदल करण्यात आला आहे त्यानुसार, संविधान समितीमध्ये जवाहरलाल नेहरु, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल किंवा बी. आर. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्याचं म्हटलं आहे. पण आझाद यांचा १९४६ मध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. ज्यावेळी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या नव्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी यासंदर्भात ब्रिटिश कॅबिनेट मिशनसोबत निगोशिएशनही केलं होतं. या काळात ते सहा वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते.

त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या भारतात समाविष्ट होण्याच्या सशर्त अटीबाबतचा महत्वाचा संदर्भही या पुस्तकातून वगळण्यात आला आहे. या पुस्तकातील दहावा धडा ज्याचं नाव 'फिलोसॉफी ऑफ दि कॉन्स्टिट्युशन' आहे यातून ही ओळ वगळण्यात आली आहे. पूर्वी या धड्यात असं म्हटलं होतं की, जम्मू-काश्मीर भारतात दाखल होण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांनी कलम ३७० द्वारे या राज्याला सुरक्षा आणि त्याची अखंडता आबाधित ठेवण्यात यावी असा उल्लेख केलेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने