ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सरसावला; म्हणाला...

मुंबई:  भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आज (शुक्रवारी 28 एप्रिल) पाचवा दिवस आहे. आता अनेक राजकीय नेते पैलवानांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राची देखील साथ मिळाली आहे.नीरज चोप्राने पैलवानांच्या समर्थनार्थ ट्विट केले की, "ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. 

आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगले काम केले आहे.""एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा."खेळाडूंची साथ मिळत नसल्याने विनेश फोगट भावूक

गुरुवारी विनेश फोगट भावूक झाल्याचे पाहिला मिळाली होती. भारतीय क्रिकेटर आणि इतर मोठ्या खेळाडूंच्या शांत बसण्यावर प्रश्न उपस्थित केला. 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चळवळीचे उदाहरण देत ती म्हणाले की, आपल्या देशात महान खेळाडू नाहीत असे नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. आमचीही लायकी नाही का?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने