मुंबई: सलमान खान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चाही सुरु आहे. नुकताच या चित्रपटचा ट्रेलरही मोठ्या दिमाखात लॉन्च करण्यात आला. भाईजानचा चित्रपट म्हटलं तर त्याच्या चाहत्यांची उत्सूकता ही शिगेला पोहचलेली असते काही तासातच हा ट्रेलर सोशल मिडियावर व्हायरल झाला. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.या चित्रपटात सलमानने अनेक वेगवेगळे प्रयोग केले. स्टार कास्टमध्ये वैविध्य आहे, साऊथच्या बड्या स्टार्ससोबत सलमाननं स्क्रीन शेअर केली आहे. विषेश म्हणजे लोकांच लक्ष वेधल ते सलमानच्या हेअरस्टाईलने.
कुठे तो लांब केसांमध्ये तर कुठे त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत असल्याचं टिझरमध्ये दिसते. बऱ्याच दिवसांनी सलमान खानने त्याच्या केसांवर प्रयोग केला. सलमानला 'तेरे नाम' मध्ये त्याची हेअर स्टाइल बदलण्याचा खूप उपयोग झाला होता.मात्र हे केवळ त्याच चित्रपटापुरता झालं कारण अनेकवेळा त्याचा हा प्रयोग फसला आहे. भाईजानचे असे काही चित्रपट ज्यात त्याने केस तर वाढवले पण ते त्याच्या चित्रपटांची कमाई वाढवू शकले नाहीत. म्हणजेच चित्रपटाच्या कमाईवर चांगलाच फटका बसला आहे.
1- सूर्यवंशी:
सूर्यवंशी हा सलमानच्या करिअरमधला पहिला चित्रपट होता जेव्हा सलमान खानने त्याची हेअरस्टाईल बदलली होती. 1992 मध्ये आलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटात सलमान खान लांब केसांमध्ये दिसला होता. या चित्रपटात तो सोनेरी रंगाच्या केसांमध्ये दिसला होता. सलमानचा हा लूक चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. चित्रपट फ्लॉप झाला होता.
2- सावन:
या चित्रपटात सलमान खान एका नव्या अवतारात आहे. लांब केसांचा लूक पूर्णपणे नवीन होता, पण हा लूक पाहून फिल्मी दुनियेत चांगलीच खळबळ उडाली. नवा अवतार खूप आवडला. मात्र 2006 मध्ये आलेला हा चित्रपट सलमानच्या मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला. यामध्येही सलमानचे केस लांब होते.
3- लंदन ड्रीम्स:
2009 मध्ये रिलीज झालेल्या लंडन ड्रीम्स या चित्रपटात सलमान खान, अजय देवगण आणि असिनसारखे सेलिब्रिटी दिसले होते. यावेळीही सलमानने पुन्हा तीच चूक केली. या चित्रपटातही त्याने केस वाढवले होते. एवढेच नाही तर केसांना सोनेरीही केले. अजय देवगणही या चित्रपटात होता पण दोघेही एकत्र चित्रपट वाचवू शकले नाहीत. सुपरस्टार असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला.
4- वीर:
सलमान खान चा वीर हा चित्रपट मल्टीस्टारर डिझास्टर ठरला. 2009 साली हा चित्रपट रिलिज झाला. त्यात मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश होता पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करु शकला नाही आणि फ्लॉप ठरला. मात्र या चित्रपटातील काही गाणी हिट ठरली.
5- अंतिम:
अंतिम सत्य हा सलमान खानचा चित्रपट 2021 मध्ये रिलिज झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात सलमान खान सरदारच्या भूमिकेत होता. मात्र सलमानचा हा प्रयोग अयशस्वी ठरला आणि बॉक्स ऑफिसवर गडगडला.आता पुन्हा एकदा किसी का भाई किसी की जान मध्ये तोच प्रयोग केला आहे. मात्र यावेळी सलमानचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.