सुदानमध्ये अराजक! भारतीय दुतावासानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्तुम येथे बंडखोर निमलष्करी दले (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यानचा संघर्ष सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.यामध्ये सामान्य नागरिकांचेही बळी गेले असून या संघर्षांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या 180 इतकी झाली आहे तसेच शेकडोजण जखमी झाले आहेत. अनेक सैनिक मृतावस्थेत दिसून आले आहेत. यापार्श्वभूमीवर सुदानमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं तिथल्या भारतीय दुतावासानं अॅडव्हाझरी जाहीर केली आहे.खार्तुममध्ये लूटमारीच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व भारतीय नागरिकांनी कृपया घराबाहेर पडू नये. कृपया भारतीयांनी आपला खान्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करुन ठेवा कारण ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते. कृपया आपल्या शेजाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. कृपया घरीच रहा आणि सुरक्षित रहा, असं दुतावासानं अॅडव्हाझरीमध्ये म्हटलं आहे.



सुदानमध्ये नेमकं काय घडलंय?

उत्तर अफ्रिका खंडातील सुदान हा सर्वात मोठा अरब देश आहे. या देशाची राजधानी खार्तुम इथं गेल्या तीन दिवसांपासून लष्कर आणि निलष्करी दलाच्या जवानांमध्ये झटापट आणि तुफान गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला आहे.

सुदानमध्ये ४,००० भारतीय नागरिक, एकाचा मृत्यू

अधिकृत माहितीनुसार सुदानमधील भारतीयांची संख्या साधारण 4,000 इतकी आहे. यापैकी 1200 लोक अनेक वर्षांपासून तिकडे स्थायिक झालेले आहेत. सध्या इथं सुरु असलेल्या संघर्षात रविवारी केरळमधील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने