आनंदाची बातमी! अनेक वर्षांनी 'आनंद सागर' पर्यटकांसाठी खुलं होणार

शेगाव : संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले. आनंद सागर दिड ते दोन महिन्यात भाविकांसाठी सुरू होणार आहे. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हनून आनंद सागरची २०० एक्कर वरती निर्मिती झाली.आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्थव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढच्या दिड ते दोन महिन्यात आनंद सागर सुरू होणार आहे. त्यामुळे संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.  

आनंद सागर पाहण्यासाठी भाविक देशभरातून येतात. आनंद सागरमुळे शेगाव शहराला मोठ नावलौकीक मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे मांदियाळी असते.आनंद सागर उद्यान व ध्यान केंद्र आहे. आनंद सागर श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत. मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत असतात. दरम्यान आता हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल अश्या हालचालीना वेग आला असून पर्यटक आनंद सागर सुरू होण्याची वाट पाहत आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने