'हिने काय केलयं पद्मश्री द्यायला', असं बोलणाऱ्यांना रवीना टंडनने चांगलच झापलं...

मुंबई: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रवीना टंडनची जादू आजही कायम आहे.रवीना टंडनची आजही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ९० च्या दशकापासून रवीना टंडनने अनेक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहेत.तिच्या चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दलच तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्या चाहत्यांबरोबरच सर्व कलाकरांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला.मात्र दुसरीकडे काहींना रविनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करणे खटकलं. रवीनाने असे काय केले आहे की तिला हा सन्मान दिला जात आहे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थीत केला. आता या सर्व टिकाकारांची बोलती रविनाने बंद केली आहे.रविनाने नुकतच मिड-डेला मुलाखत दिली. तिने दिलेल्या या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली, 'मला त्यांना कोणतंही महत्त्व द्यायचं नाही, कारण त्यांचा स्वतःचा अजेंडा आहे. 20 फॉलोअर्स असलेल्या आणि माझे काम पाहिलेलं नसलेल्या लोकांच्या टिकेचा माझ्या कामावर परिणाम होणार नाही.पुढे ती म्हणते, ट्रोल्सना फक्त ग्लॅमर दिसतं, त्यांना आमची मेहनत किंवा आम्ही किती तास काम करतो ते त्यांना दिसत नाही. सोशल मिडियावर आजकाल किती अवघड गोष्टी घडत आहे हे आपल्याला माहित आहे पण काहींनी शुभेच्छा पाठवून ते सोप केलं.

रविना पुढे म्हणाली, 'मला प्रकर्षाने जाणवणाऱ्या मुद्द्यांवर चित्रपट करण्याचा मी प्रयत्न करते. निर्भया प्रकरणाने मला इतकं हादरवलं की मला मातृ हा चित्रपट (2017) करायचा होते.'दमन' असो, 'जागो' असो की 'मातृ', या चित्रपटांमध्ये महिलांवरील हिंसाचार आणि महिला सक्षमीकरणावर भाष्य करण्यात आलयं. मला व्यावसायिक सिनेमा आवडतो, पण समाजात बदल घडवणाऱ्या अशा प्रकल्पांवरही माझा भर असतो.रवीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रवीना टंडन आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'घुडचढी' मध्ये दिसणार आहे. यात संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्याही भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने