सैफच्या मुलासोबत डेटिंगच्या बातमीनंतर श्वेतानं फोनवरच घेतली होती पलकची शाळा.. विचारला होता 'हा' प्रश्न

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सिनेमात पदार्पण करण्याआधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत तिच्याविषयी मीडियानं बातमी समोर आणली होती की पलक अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे.त्या दोघांना अनेकदा एकत्र क्लिक केलं गेलं. पहिल्यांदा पलक आणि इब्राहिम या दोघांना गेल्या जानेवारीत एकत्र पाहिलं होतं. त्यावेळी पापाराझीचा कॅमेरा पाहून पलकने आपला चेहरा लपवला होता.ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. जेव्हा तिची आई श्वेता तिवारीला याविषयी माहित पडलं तेव्हा तिची रिअॅक्शन कशी होती याविषयी आता पलकनं खुलासा केला आहे.पलक तिवारीनं नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. त्यादरम्यान तिनं आपले करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.पलक तिवारीनं इब्राहिमसोबतच्या लिंक अपच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं. तसंच,हे जेव्हा आपल्या आईला कळालं होतं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती याचा देखील तिनं खुलासा केला आहे.

पलक तिवारी म्हणाली,''जेव्हा माझ्या आईनं या डेटिंग अफवांच्या बातम्या पाहिल्या तेव्हा तिनं मला लिंक पाठवली आणि मला विचारलं की, 'हा कोण आहे आणि कधीपासून आहे तुझ्या आयुष्यात?'यावर पलक तिवारी आपल्या आईला म्हणाली,''अगं..कुणी नाही...कारण खरंच काही नाहीय आमच्यात''. पलक तिवारीनं हे देखील सांगितलं की तिची आई श्वेता तिला कधीच क्रॉस क्वेशन्स करताना प्रश्नांच्या फैरी झाडत नाही.माहितीसाठी इथं नमूद करतो की, पलक सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने