अखेर परिणीती सोबतच्या नात्यावर राघव चड्ढांनी सोडलं मौन, चेहऱ्यावर स्माईल ठेवत केलं मोठं वक्तव्य..

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत आहे. आप नेता राघव चड्ढा यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. राघव आणि परिणीती हे दोघे क्लासमेट्स होते. पण दोघांमध्ये प्रेम फुललं ते काही महिन्यांपूर्वीच.या बातम्यांवर ना परिणीती ना राघव चड्ढा..कोणीच काहीच बोललेलं नाही. मात्र मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार दोघे एप्रिल महिन्यात साखरपुडा करणार आहेत. आणि लवकरच लग्नगाठही बांधतील. पण आता पहिल्यांदा राघव चड्ढा यांनी या बातम्यांवर मौन सोडलं आहे आणि हसत हसत जे काही म्हटलं आहे त्यानं चाहते मात्र सुखावले आहेत.आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की गेल्या काही दिवसात राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राला त्यांच्यातील रिलेशनशीपवरनं अनेक प्रश्न केले गेले. तसं पाहिलं तर दोघांनीही यावर बोलणं टाळलं पण नुकतंच राघव चड्ढांनी यावर मौन सोडलं आहे. एका मीडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांना पुन्हा परिणीतीवरनं छेडलं गेलं. तेव्हा ते गप्प नाही बसले.जेव्हा पत्रकारानं त्यांना विचारलं की परिणीती सोबत तुमच्या नावाची खूप चर्चा होताना दिसत आहे. तेव्हा ते हसत म्हणाले, 'आज तुम्ही सेलिब्रेट करा की आम आदमी पार्टी नॅशनल पार्टी बनली आहे. अजून असे कितीतरी क्षण येतील सेलिब्रेट करण्याचे''.राघव चड्ढा यांच्या या वक्तव्यानं चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचवली आहे. लोकांना आता ठाम विश्वास आहे की परिणीती आणि राघव चड्ढा लवकरच लग्नाची अपडेट देतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने