तुनिषा आत्महत्याप्रकरणात बाहेर आल्यानंतर शिजानला भेटला पहिला प्रोजेक्ट....

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या आत्महत्येनेनंतर तिचा कोस्टार शिजान खान या पोलिसांनी अटक केली. तुनिषाच्या आईने तिच्या आत्महत्येसाठी शिजानला जबाबदार ठरवले होते.'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या सेटवर तिने आत्महत्या केली होती. त्यानंतर शिजानवर अनेक आरोप झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. आता त्याचे आयुष्य हळूहळू रुळावर येत आहे.शीजान खान आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' या शोमध्ये दिसणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. तब्बल चार महिन्यांनंतर तो पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. तो अखेरचा 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेत दिसला होता.समोर आलेल्या माहिती नुसार जवळपास चार महिने कामापासून दूर राहिल्यानंतर शीझान खान लवकरच कामात परतणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या 13व्या सीझनसाठी निवडलेला तो नवीनतम सेलिब्रिटी आहे.मात्र अद्याप याबद्दल शिझानने स्वत: कोणतीही माहिती दिलेली नाही. तरी 'खतरों के खिलाडी' या शोमधील एका व्यक्तीने याबद्दल सांगतिले आहे की , या शो च्या १३व्या सिझनमध्ये सिझान खान दिसणार आहे. त्याचं नाव फायनल झालं आहे.शीझान खानला १ लाख रुपये भरुन वसई कोर्टानं जामीन मंजूर केला.जामीन मिळाला मात्र शीझान खानला शिक्षा म्हणून आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागला आहे. दरम्यान त्याचा प्रवास आणि इतर कागदपत्रांबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. मात्र, शीजन यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

5 मार्च 2023 रोजी या प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास 70 दिवसांनी शीजानची जामिनावर सुटका करण्यात आली. 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'च्या निर्मात्यांनी तिच्या जागी अभिषेक निगम आणि मनुल चुडासामाला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले. शोचे नाव देखील बदलण्यात आले आणि तो 'अली बाबा: एक अंदाज उंडेखा अध्याय 2' म्हणून प्रसारित करण्यात आलं आहे.'खतरों के खिलाडी च्या 13व्या सिझन बद्दल बोलतायचं झालं तर शिव ठाकरे, अर्चना गौतम, न्यारा बॅनर्जी, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अंजली आनंद आणि अरिजित तनेजा हे कलाकार स्पर्धक कन्फर्म झाले आहेत.समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 13 वा सिझन देखील रोहित शेट्टीच होस्ट करणार असून हा शो कलर्सवर 17 जुलैला रात्री 9:30 वाजेपासून सुरु होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने