भारतात कुणी विचारेना पण परदेशात थेट किंग चार्ल्सच्या मैफलीत लागला सोनमचा नंबर..

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सोनमचे चित्रपट जरी इतके फारसे चालले नाहीत पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच तिच्या चर्चेत असते. आज सोमनसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.त्यामागे कारणही तसचं आहे. ती 7 मे रोजी किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री बनली आहे.याकार्यक्रमात ती लिओनेल रिची, कॅटी पेरी आणि टॉम क्रूझ यांसारख्या आंतरराष्ट्रीय आयकॉन्ससोबत स्टेज शेअर करणार आहे. ही निश्चितच तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे.किंग चार्ल्स III यांचा कॉरोनेशन कॉन्सर्ट युनायटेड किंगडममधील विंडसर कॅसल येथे पार पडणार आहेयाच या कार्यक्रमाबद्दल सोनमने सांगितले की, "किंग चार्ल्सचे संगीत आणि कलेबद्दलचे प्रेम साजरा करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमासाठी कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरमध्ये सामील होण्याचा मान मिळाला. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे"व्हरायटीमधील वृत्तानुसार, सोनम कपूर 'कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयर' सादर करण्यासाठी स्पोकन वर्ड परफॉर्मन्स देण्यासाठी स्टेजवर दिसेल. सोनम ही तिचा आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत लंडनमध्ये राहते.

किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेकाच्या मैफिलीबद्दल बोलायचं तर, 6 मे रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राजा आणि राणीच्या राज्याभिषेकानंतर, 7 मे रोजी विंडसर कॅसल येथे एक समारंभ आयोजित केला जाईल. Hugh Bonneville द्वारे आयोजित, मैफिलित 20,000 सार्वजनिक सदस्य आणि आमंत्रित अतिथी, तसेच जगभरातील लाखो लोक सहभागी असतील.सेलिब्रेटरी कॉन्सर्टमध्ये कॅटी पेरी, लिओनेल रिची, अँड्रिया बोसेली, सर ब्रायन टेरफेल, फ्रेया राइडिंग्स, अॅलेक्सिस फ्रेंच यांसारखे कलाकार आहेत. सोनम चित्रपटात कमी सक्रिय आहे. तरी तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, ती शेवटची 'द झोया फॅक्टर ' चित्रपटात दिसली होती  तसेच आता ती आगामी काळात ' ब्लाइंड ' या चित्रपटात दिसणार आहे  .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने