दिल्ली उच्च न्यायालयाचा शाहरुख खानला मोठा दिलासा! काय आहे प्रकरण

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. त्याचा 'पठाण'च्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच वादळ घेवुन आला होता. त्याने या चित्रपटाच्या माध्यमातुन पुन्हा त्याच बॉलिवूडवरिल वर्चस्व सिद्ध केले आहे.आता तो त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शाहरुखच्या या चित्रपटाचे काही व्हिडिओ लिक झाले होते. त्यानंतर सोशल मिडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते.चित्रपटाचे शूटिंगही खूप जवळापास पुर्ण झाले असून या चित्रपटातील शाहरुखचा पोस्टर्सही रिलीज करण्यात आले आहेत. शाहरुख खानचा लूक पाहून चाहते त्याला आणखी एक हिट होणार याची खात्री आहे. अलीकडेच शाहरुखच्या 'जवान'चे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.पहिल्या क्लिपमध्ये किंग खानसोबतचा फाईट सीक्वेन्स दाखवण्यात आला होता, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो आणि नयनतारा डान्स सीक्वेन्समध्ये दाखवण्यात आला होता.आता या व्हायरल व्हिडिओ संबधी हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड जे शाहरुख खान आणि गौरी खान यांच प्रॉडक्शन आहे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या तक्रारीत त्यांच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या दोन क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लीक झाले असल्याच सांगितलं होत. या व्हिडिओला शाहरुखच्या टीमने सर्व सोशल मीडियावरून हटवण्यास सांगितले होते.दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी वेबसाइट्स, केबल टीव्ही प्लॅटफॉर्म, थेट टू होम सेवा तसेच 'जॉन डो' प्रतिवादींना 'जवान'च्या कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून थांबवलं आहे. शाहरुख आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस 'रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी हे आदेश दिले आहेत.न्यायालयाने आपल्या आदेशात यूट्यूब, गुगल, ट्विटर आणि रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 'जवान' चित्रपटाच्या कॉपीराइट केलेले व्हिडिओ हटवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी अनेक इंटरनेट सेवा प्रदात्यांना चित्रपटाशी संबंधित सर्व अ‍ॅक्सेस ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने