बारसू आंदोलन चिघळलं! पोलिसांची महिलांना मारहाण; व्हिडीओ काढणाऱ्याचा फोन हिसकावला

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन कोकणात मोठा संघर्ष पाहिला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरून वाद विवाद चालू आहे. रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. आजपासून या ठिकाणी जमीन सर्वेक्षण केलं जात असून या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी येथे हजारोच्या संख्येने आंदोलक पोहचले आहेत.दरम्यान यावेळी महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर महिलांना मारहाण करतानाचा व्हिडीओ कढला म्हणून पोलीसांनी आंदोलनात सहभागी तरुणाचा फोन हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.यावेळी पोलिसांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणाकडे निघालेल्लाय आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असाता काही वेळासाठी याठिकाणी गोंधळाची परिस्थिती तयार झाल्याचे पाहायला मिळालीआंदोलकांनी बॅरिकेटींग तोडून सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान आंदोलनातील एका तरुणांचा व्हिडीओ शूटींग करताना पोलिसांनी मोबाईल फोन हिसकावून घेतला. महिलांना मारहाण करतानाचा व्हिडीओ काढला म्हणून पोलीसांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचं तरुणाने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. त्या फोनमध्ये महिलांना मारहाण करतानाचा व्हिडीओ असे तरुणाने सांगितलं.इतकेच नाही तर आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धूराचा वापर देखील करण्यात आला. आंदोलनस्थळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्याने आग लागल्याची घटना घडली.दरम्यान स्थानिक खासदार विनायक राऊत हे आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईवरुन राऊत हे बारसूकडे रवाना होताना पोलिसांनी त्यांना तेथे न जाण्यास सांगितले होते, मात्र विनायक राऊत हे आपल्या भूमिकेवर ठाम होते.ते आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडवले. त्यावेळी राऊतांनी रस्त्यातच ठाण मांडले. त्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बारसूच्या माळरानावर ताब्यात घेण्यात आलं

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने