बारसू रिफायनरी आंदोलन पेटलं! आंदोलनस्थळी पोलिसांची वाट अडवणाऱ्या २५ महिलांना अटक

मुंबई:  कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलन आता तीव्र स्वरुपात करण्यात येत आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले आहेत. मात्र स्थानिक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनस्थळावरून हटणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर २५ आंदोलक महिलांना अटक कऱण्यात आली आहे.आमच्या जमिनी आम्ही कोणालाही देणार नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी आंदोलकांना आणि माध्यम प्रतिनिधींना देखील आंदोलनस्थळावरून बाजुला होण्याचे निर्देश देण्यात आले असून या भागात कलम १४४ लावण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. तसेच २५ आंदोलक महिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी महिती दिली आहे.या भागातील ग्रामस्थांना सातत्याने रस्त्यावरून बाजुला जाण्यास सांगितलं आहे. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असून कोणताही नेता अद्याप आंदोलनस्थळी कोणाही पोहोचलेलं नाही. समाज माध्यमांवर नेत्यांकडून प्रतिक्रिया देत असून अद्याप कोणीही आंदोलनस्थळी पोहोलचले नाही.आजपासून रिफायनरीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. याआधी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यासोबत इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने