शरद पवार मोदी सरकारवर संतापले; 'या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही'

मुंबई:  मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी केला होता. तसंच या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मला शांत राहण्यास सांगितल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात पवार यांनी उत्तर दिलं आहे.जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात पवार यांनी उत्तर दिलं आहे.काय म्हणाले शरद पवार?

'पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यपाल मलिक त्याची नियुक्ती भाजपने केली होती. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला असे मलिकांनी सांगितले. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितले.पण त्यांनी न बोलण्यासाठी त्यांना सागितले. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही.' असे परखड मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.तसेच, आज शेतकरी अडचणीत आहे. दहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी मेळाव्याला गेलो. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं. निसर्ग आपल्या हातात नाही पण संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे.

शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे. असं शरद पवार म्हणाले.यासोबतच, आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊसामुळे हाहाकार झाला आहे पण अजून मदत मिळाली नाही. शेतीमाल निर्यातीला बंदी आणि माल आयत करण्यासाठी परवानगी दिली यांची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. याबाबत निर्णय घेतला पाहिजे. असा पुनरुच्चार पवारांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने