Rahul Gandhi यांनी शेअर केला आंबेडकरांचा स्पेशल व्हिडिओ

दिल्ली: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आंबेडकरांना अभिवादन केले असून त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे."समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय' बाबासाहेब आंबेडकरांनी जी वैश्विक मूल्ये प्रस्थापित केली, ती नेहमीच आमची मार्गदर्शक आणि शक्ती राहतील! भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन." असं कॅप्शन टाकून राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जगभरात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. भारतीय राज्यघटने शिल्पकार आणि समाजात समता नांदवी यासाठी आयुष्यभर झगडणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक गोष्ट केल्या. त्यामुळे त्यांचे ऋण न फिटण्यासारखे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने