रॅपर राज मुंगासेचं बरं वाईट झालं? कुटुंबीयांची चिंता, अटकेपासून ठावठिकाणा नाही

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मंत्रीपद गमवावं लागलं. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतो.दरम्यान महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गाणं राज मुंगासे या रॅपरने तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या तक्रारी वरून रॅपर राज मुंगासे या तरूणाला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आलं. मात्र या तरूणाला कोणत्या पोलिसांनी कोठून अटक केली याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळत नाही.राज मुंगासे या तरूणाच्या भावाने पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्याला उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत त्याची तक्रार पोलिस घेत नाहीत. तसेच मुंबई पोलिसांना फोन वरून विचारना केली असता, ते सांगतात तो,संभाजीनगरला अटक आहे. पण नेमक्या कोणत्या पोलिस स्टेशनला हे सांगत नाहीत. असा आरोप त्यांचा भावाने केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांना विनंती केली आहे की, "राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली.

पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे" दरम्यान राज मुंगासेच्या कुटुंबाला भिती वाटत आहे की, त्याचं काय बरं वाईट झालं की काय?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने