'मी प्रेमात नेहमीच..', अखेर अनेक वर्षांनी रिलेशनशीपमधील अपयशावर सलमान स्पष्टच बोलला..

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खाननं आपल्या रिलेशनशीप स्टेटसवर मोठा खुलासा केला आहे. सलमान खान काही दिवसांपूर्वी 'आप की अदालत' कार्यक्रमात पोहोचला होता. 'आप की अदालत' मध्ये जेव्हा शो चे होस्ट रजत शर्मा यांनी भाईजानला त्याच्या रिलेशन शीप स्टेटसविषयी विचारलं तेव्हा सलमान खाननं कोणतीही मजा मस्करी न करता अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मेकर्सनी युट्यूबवर 'आप की अदालत' या कार्यक्रमाचा एक टीझर प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला सलमान खान आपल्या अनोख्या अंदाजात एंट्री करताना दिसत आहे. जसं सलमान खान आरोपीच्या पिंजऱ्यात गेला तसं रजत शर्मा यांनी त्याला 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच वेळी त्यानं केलेल्या 'मूव्ह ऑन' कमेंटवर प्रश्न केला.सलमान हसत म्हणाला,''प्रेमाच्या बाबतीत मी कमनशिबी आहे सर''. मग रजत शर्मा यांनी विचारलं,'तर आजकाल कोण आहे तुझी जान?तू कोणाशी कमिटमेंट केलीयस?'

सलमान म्हणाला,''मी फक्त आजकाल भाईच आहे. माझं ज्यांच्यावर प्रेम होतं ,ज्यांना मला जान बनवायचं होतं ते आजकाल मला 'भाई' म्हणून बोलावत आहेत..काय करू?''

आता हे काही पहिल्यांदा घडत नाही जिथे सलमान खान 'आप की अदालत' मध्ये आला आहे. याआधी देखील २०१२ मध्ये आपल्या 'दबंग' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमान शो मध्ये दिसला होता. तर यावेळी सलमान 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिसला. सलमान आणि पूजा हेगडेचा हा सिनेमा सध्या सिनेमागृहात चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या सिनेमानं आतापर्यंत बॉक्सऑफिसवर ९०.१५ करोडची कमाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने