ऐश्वर्याला तब्बल 24 वर्षानंतर आठवला आपला आणि सलमानचा हा सिनेमा... ऐकून सगळेच हैराण

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रीची चर्चा केली तर त्यात ऐश्वर्या राय बच्चनचे नाव नक्कीच येईल. ऐश्वर्या तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ऐश्वर्या तिचा आगामी चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनने 'हम दिल दे चुके सनम' ते 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटातील नंदिनीच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलेपणाने बोलले आहे. तसेच, अभिनेत्रीने सांगितले की पीएस-1 आणि पीएस-2 मधील नंदिनीची व्यक्तिरेखा ऐकून ती खूप उत्साहित झाली होती.'पोन्नियिन सेल्वन 2'च्या प्रमोशनदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ऐश्वर्या राय बच्चनने 'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटात नंदिनी म्हणून निवड झाल्याबद्दल उघडपणे बोलले. ऐश्वर्याने पत्रकारांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली.यातील एक प्रश्न ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाशीही निगडीत होता. पीएस 2’मध्ये पुन्हा एकदा नंदिनी नावाची भूमिका साकारण्यावरून ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला.‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये ऐश्वर्याच्या भूमिकेचे नाव नंदिनी असे आहे. योगायोग म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही तिचं नाव नंदिनी असं होतं. आता ऐश्वर्याला ‘पीएस 2’मध्ये पुन्हा एकदा नंदिनी नावाची भूमिका साकारण्यावरून एका प्रश्न विचारण्यात आला.

तेव्हा प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, 'काय योगायोग आहे हा? किती चांगली गोष्ट आहे ना ? हम दिल दे चुके सनममधील नंदिनी माझ्या हृदयाच्या खूप जवळची आणि खास आहे. नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी संजय लीला भन्साळी आणि प्रेक्षकांसाठी ते नेहमीच खास बनले. तसेच, पीएसमध्ये नंदिनीची भूमिका करताना मला खूप आनंद होत आहे कारण यात सशक्त महिलांचे पात्र दाखवण्यात आले आहे.'‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने