"हे ठरणार भाजपच्या पराभवाचे कारण..." दोघा आमदारांनी राजीनामा देत केली टीका

बंगळूर: भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नाही. उमेदवारी न मिळाल्याने आमदार एम. पी. कुमारस्वामी आणि आमदार नेहरू ओलेकर यांनी भाजपचा राजीनामा दिला.एम. पी. कुमारस्वामी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्यावर संताप व्यक्त केला. रवी हेच राज्यात भाजपचा पराभवाचे कारण ठरणार आहेत. रवी यांनी दिल्लीत लपंडाव खेळत आहेत. येडियुराप्पा यांनी १५ दिवस मोबाईल बंद ठेवला, तर त्यांना ५० जागाही मिळणार नाहीत.भाजपचे आमदार नेहरू ओलेकर यांनीही उमेदवारी नाकारल्याने त्यांनी गुरुवारी पक्ष सोडला. उमेदवारी डावलण्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कारणीभूत असल्याचा त्यांनी आरोप केला. अनुसूचित जाती समाजातील ६५ वर्षीय आमदार ओलेकर आपल्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने