"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही"

मुंबई: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानाबद्दलही भाष्य केलं आहे.काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांच्या या विधानाबद्दलचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या वृत्तानुसार, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी इतर पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे.पवार म्हणाले, "मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या संख्येवरुन ठरलं होतं. यामध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते. जर कोणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद करणं गरजेचं होतं. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने