चीन-भारत वाद सोडविण्यास प्राधान्य; चीनचे प्रतिपादन

बीजिंग: पूर्व लडाखमधील संघर्ष व सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यास प्राधान्य देण्यावर भारत व चीनने सहमती दर्शविली असल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिली.भारत-चीन लष्करी पातळीवरील चर्चेची १८ वी फेरी चीनच्या भागातील चुशुल-मोल्डो सीमेवर रविवारी (ता.२३) झाली. चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी भारतात येणार आहे. ही बैठक २७ आणि २८ एप्रिलला होणार आहे. त्याआधी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण व प्रामाणिकपणे विचार मांडले, असे चीनच्या‘पीएलए’ ने सांगितले.



समस्यांचे निराकरण करण्‍यावर चर्चा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, पश्चिम क्षेत्रातील नियंत्रण रेषेवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी खुली व सखोल चर्चा झाली. पश्‍चिम विभागात सुरक्षा व स्थैर्य राखण्यास दोघांनी मान्यता दिली. पूर्व लडाखचा उल्लेख सरकारने पश्‍चिम भाग असा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने