'अजितदादा अस्वस्थ, काहीही होऊ शकतं', शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याच्या चर्चा सुरू असून अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या या चर्चावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.यावर बोलताना शिंदे समर्थक आणि मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावरून मंत्री दादा भुसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दादा भुसे यांनी 'अजित पवार हे अनेक वर्षांपासून अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे'.'अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजित दादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं' असं त्यांनी म्हंटलं आहे.तर दादा भुसे यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर इंदू मिलबाबत बोलताना दादा भुसेंनी म्हटलं की, बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी सगळ्यांचीच मागणी आहे. मागच्या काळात ते काम सुरूही झालं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या कामाची पाहणी केली आहे. मला वाटतं की ते काम लवकरच पूर्ण होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने