'या' चाळीत राहायचे मुकेश अंबानी, 100 लोकांसाठी होते चक्क एक बाथरूम

मुंबई: रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अन् जगातील श्रीमंत व्यक्तीच्या लिस्टमध्ये येणारे मुकेश अंबानींनी  आज वयाचे 66 वर्ष पुर्ण केली आहे. त्यांचा जन्म 19 अप्रैल 1957 को भारताबाहेर यमन येथे झाला होता.वडिल धीरूबाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सर्व सुत्र आलीत आणि त्यांनी सर्व व्यवसायांमध्ये विस्तार केला पण तुम्हाला माहिती आहे का श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गणले जाणारे मुकेश अंबानी एकेकाळी मुंबईच्या चाळीत राहायचे. होय, हे खरंय.



आज आपण त्याविषयची सविस्तर जाणून घेणार आहोत.मुकेश अंबानीचे यांचे भाऊ अनिल अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते एकेकाही मुंबईच्या कबूतरखाना भागातील एका चाळीत राहायचे. वडिल धीरूभाई अंबानी रोजगारासाठी परदेशात गेले आणि तेथील पेट्रोल पंपावर काम करायचे तेव्हा त्यांनाही भारतासाठी करावे, असे वाटायचे.याच उद्देशाने जेव्हा १९५९ या वर्षी धीरूबाई भारतात परतले. तेव्हा त्यांच्या कुटूंबात सात लोक होती आणि हे सात लोकांचे कुटूंब कबूतरखाना भागातील एका चाळीत राहायचे. या चाळीतच मुकेश अंबानी यांचे बालपण गेले.

या चाळीत 100 लोकांसाठी होते चक्क एक बाथरूम

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटूंब ज्या चाळीत राहायचे त्या चाळीत १०० लोकांसाठी चक्क एक बाथरुम होते. अंबानी ज्या चाळीत राहायचे ती चाळी खूप मोठी होती. आज कदाचित त्यांच्या घरात १०० च्या जवळपास बाथरुम असतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने