संजय राऊतांनी घेतली सत्यपाल मलिकांची भेट; भगतसिंग कोश्यारींवर साधला निशाणा

दिल्ली : खासदार संजय राऊत यांनी आज माजी राज्यपाल सत्यपाल मलिकयांची भेट घेतली. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.TV9 मराठीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, 'मी आज सत्यपाल मलिकांची सदिच्छा भेट घेतली. भविष्यात देशात परिवर्तन हवं असेल, तर त्यांची काय भूमिका राहिल यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. यावेळी जाट, एससी समाजाचे नेते उपस्थित होते.'ते पुढं म्हणाले, बाकीची चर्चा आम्ही भविष्यात करत राहू. सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात यायचं आहे. सध्या ते हरियाणा, राजस्थान, बिहार अशा भागात जावून आले आहेत. महाराष्ट्रात येण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे.यावेळी त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. कोश्यारींचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलं जातं. ते सत्य मानलं जातं. त्यांचे निर्णय सत्य मानले जातात, जे बेकायदेशीर आहेत. त्यांनी केलेलं राजकारण तुम्ही सत्य मानता, मग सत्यपाल मलिकांच्या वक्तव्यांना का दोष देता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने