मुंबई: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवारांच्या नाराजीला सुरूवात पार्थ पवार यांच्या पराभवा पासून झाली आहे. अजित पवारांनी सकाळी घेतलेल्या शपथविधीवर अडीच वर्षांनंतर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं मात्र अजित पवार यांनी आज पर्यंत स्पष्टीकरण दिलं नाही. अजित पवार मोठ नेते आहेत ते सहजा सहजी मनातील गोष्ट सांगतील हे शक्य नाही, परंतु महाविकास आघाडीच्या मेळाव्यात अजित पवारांना स्थान शोधावं लागतंय.
नागपूरच्या सभेत अजित पवार यांना साध बोलून पण दिलं जात नाही असं काय होतय याच्या मागचं राजकारण कळायला मार्ग नाही. तर १४ आमदार असलेल्या नेत्याचं प्रमुख भाषण आणि ५४ आमदार असलेल्या नेत्याला साध बालून पण देत नाहीत, अजित पवार यांना बाजूला केलं जात आहे. त्यांचा हा अपमान आहे. असं म्हणत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मविआमध्ये होत कशा प्रकारे घुसमत होत आहे, हे संजय शिरसाट यांनी सांगितलं.
पार्थ पवार यांचा पराभव
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा लोकसभेत पराभव झाला. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली.शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 215913 मतांनी पराभव केला होता. पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सर्व ताकद पार्थ यांच्या मागे लावली होती. खुद्द अजित पवार आणि राष्ट्रवादीचे बडे नेते पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये होते. तरीही पार्थ पवार यांचा पराभव झाला.