शाहीरांच्या पत्नी राधाबाईंना कसा वाटला महाराष्ट्र शाहीर? एका कृतीत सगळं आलं

मुंबई: गेले अनेक दिवस ज्या सिनेमाची खूप चर्चा आहे असा महाराष्ट्र शाहीर सिनेमा आज २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. कसा आहे हा सिनेमा जाणून घेऊ..महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहून प्रेक्षक भारावले आहेत. प्रेक्षक सिनेमाला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंना हा सिनेमा कसा वाटला याचं उत्तर मिळालंय. केदार शिंदेंनी आजी राधाबाईंचा एक फोटो शेयर केलाय. या फोटोत राधाबाईंनी केदारला मिठी मारलेली दिसतेय. महाराष्ट्र शाहीर राधाबाईंना कसा वाटलं याचं उत्तर या एका कृतीमधून आलेलं दिसतंय.केदार शिंदे हा फोटो शेयर करून म्हणतात.. आणि ही प्रतिक्रिया होती.. मालती कदम अर्थात श्रीमती राधाबाई साबळे यांची. महाराष्ट्र शाहीर पाहिला असेल तर लागलीच लक्षात येईल. पाहिला नसेल तर आजच तिकीट काढून पाहा. तरच या लाख मोलाच्या जादू की झप्पी चे महत्व समजेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने