वीणा नंतर शिव ठाकरेला मिळाली त्याची 'ड्रीम गर्ल'! 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट?

मुंबई:  रिअॅलिटी शो बिग बॉसचा 16 वा सीझन जरी संपला असला तरी त्यातले सर्वच कलाकार चर्चेत असतात. सोशल मिडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या शोनंतर अनेक स्पर्धकांचं नशीब चमकल आहे.स्पर्धकांना एकामागून एक अनेक प्रोजेक्ट मिळत आहेत. दरम्यान, या शोचा स्पर्धक शिव ठाकरे हा देखील चर्चेत असतो. तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 16' या शोमध्ये दिसणार आहे.त्याचबरोबर शिव ठाकरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याला त्याची ड्रिम गर्ल मिळाली आहे. शिव एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे सांगितलं जात आहे.शिव ठाकरे हा अनेक वेळा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिलेला आहे. बिग बॉसमध्ये त्याने अनेकवेळा सांगितले आहे की तो सिंगल आहेत आणि कोणाची तरी वाट पाहत आहेत. त्यामुळेच त्याच्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. शिव ठाकरे टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याचा दावा अलीकडे करण्यात येत आहे. दोघंही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यानंतर डेटिंगच्या अफवा वार्‍यासारख्या पसरल्या आहे.मात्र या बातमीवर आता आकांक्षा पुरी हिने नुकताच खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की या बातम्या बिनबूडाच्या आहेत. अशा बातम्यांवर मला हसू येते.

तिने शिवविषयी सांगितले की, 'डेटींगच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही'. शिव चांगला खेळतो. तो एक सुंदर आणि चांगला माणूस आहे पण दुर्दैवाने मला चांगली मुले मिळत नाहीत.आता तिच्या या वक्तव्यानंतर पुन्हा नवीन चर्चांना उधाण आलं आहे. आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर चाहते थोडे संभ्रमात पडले आहेत. तिने शिवला काही हिंट दिली आहे का असा सवाल ते करत आहेत. तर दुसरीकडे तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला टोमणा मारला आहे का असंही काहीजण म्हणत आहे.आकांक्षा पुरीने बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्राला डेट केले आहे. पारससोबतचे तिचे नाते अतिशय वाईट वळणावर संपले. तर शिवच्या बाबतीत बोलयचं झालं तर शिव बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक वीणा जगताप हिच्या प्रेमात होता. बिग बॉसमधुन बाहेर आल्यानंतरही त्यांनी ऐकमेंकाना डेट केल. त्यानंतर त्याचं नात संपल. सध्या वीणा आणि शिव दोघंही सिंगल आहे. मात्र दोघांबद्दल बऱ्याच अफवा पसरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने